पनवेल : आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान आणि दिशा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘श्रावणी महोत्सव’ कार्यक्रम वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रावण महिन्याचे औचित्य साधून आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाला कला क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलाकार तसेच रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अश्मिक कामठे यांच्या लावणीने कार्यक्रमास रंगत आली.
यावेळी आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान व दिशा मंचच्या पदाधिकार्यांनी सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतून अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासोबतच कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठान व दिशा मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थित मान्यवर, कलाकार आणि रसिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. श्रावणी महोत्सवामुळे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आणि कलाकार व रसिकांसाठी हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
पनवेल येथील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगलेल्या अभूतपूर्व श्रावणी महोत्सवात रायगड श्रावणसम्राज्ञी Regular Look Winner - जयश्री राठोड, Curvi Look Winner - मधुरा दंडवते, 1 st Runner Up - डॉ ललिता पवार गायकवाड, 2 nd Runner Up - स्नेहल जगे तर मंगळागौर स्पर्धा प्रथम- चंद्रकोर मंगळागौर ग्रुप, द्वितीय - गौरीधारी अक्षर ग्रुप, तृतीय-श्रावणसखी मंगळागौर ग्रुप, उत्तेजनार्थ - स्वामिनी मंगळागौर ग्रुप यांनी बाजी मारली. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मोहिनी विक्रांत पाटील, स्नेहल स्वप्नील ढमाले - पाटील, दिशा कल्चरल इव्हेन्टस - दिशा महिला मंचच्या संस्थापिका, अध्यक्षा निलम आंधळे, उपाध्यक्षा विद्या मोहिते व अन्य मान्यवर उपस्थित होते.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.