loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड-दहागावात किराणा दुकान फोडले, २,२०० रुपयांची रोकड लंपास

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील दहागाव येथे चोरट्यांनी एका किराणा दुकानाला लक्ष्य करत दुकानाचे पत्रे काढून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील २,२०० रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे दहागाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद असलेल्या किराणा दुकानाच्या छताचे पत्रे काढले. त्यानंतर दुकानात शिरून गल्ल्यात ठेवलेली दिवसभराची कमाई लंपास करून पोबारा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg