चिपळूण (संदेश कदम) - डाॅ.बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मयूरपंख २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवामध्ये चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत,साहित्य, नाट्य अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे, सर्जनशीलतेचे आणि सांघिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
संगीत विभागात तालवाद्य प्रकारात ओंकार पाटील (कृषि) याने द्वितीय क्रमांक, स्वरवाद्य मध्ये स्वयम्भू मेस्त्री (कृषि) याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच भारतीय समुहगीत प्रकारामध्ये कृषि महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. साहित्य विभागातील प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्राची कोंढाळकर, राम चव्हाण आणि उत्कर्ष पाटणकर (कृषि) या विद्यार्थ्यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. नाट्य विभागामध्ये प्रहसन कला प्रकारामध्ये कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष ठसा उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुकनाटय स्पर्धेत अन्न तंत्रज्ञान विभागाने तृतीय क्रमांक, तर एकांकीका स्पर्धेमध्ये अन्न तंत्रज्ञान विभागाने द्वितीय क्रमांक मिळवला. मिरवणूक स्पर्धेत कृषि विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक मिळविला.
संगीत, साहित्य, नाट्य आणि मिरवणूक अशा विविध कलाप्रकार मध्ये मिळालेल्या या यशाबद्दल शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाने ‘मयूरपंख २०२६’ मध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधान सभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयामधील सांस्कृतिक विभागाचे प्रा. विक्रांत साळवी, प्रा.सुशांत कदम, प्राध्यापिका अंकीता पाटील, प्रा.निशिकांत पाकळे, दिग्दर्शक चंद्रशेखर मुळ्ये, सागर कुंभार, तसेच अक्षय पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.