मुंबई - राज्यात सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत तब्बल एक कोटी २२ लाख मतदारांच्या गणना प्रपत्रात त्रुटी आढळून आल्या असून या सर्वांना अधिक पुरावे सादर करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रारुप मतदार यादीतील नावे वगळण्याबाबत मतदार संघाबाहेरील कोणाचाही आक्षेप अर्ज स्विकारु नये तसेच मतदाराच्या नावाला आक्षेप घेणाऱ्याकडेच अपात्रेबाबतचे पुरावे मागा असे आदेश राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांची तपासणी सुरु असून मतदारांनी भरुन दिलेल्या गणना प्रपत्राच्या आधारे निडणूक आयोगाने राज्याची प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. विशेष सखोल पुनरिक्षणापूर्वी महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार०४९ इतके मतदार होते. प्रारुप मतदार यादीत यापैकी ७ कोटी.७१ लाख ६५ हजार ५६२ (७८.८६ टक्के) मतदार समाविष्ट करण्यात आले असून त्यामध्ये ३.कोटी ९५. लाख ८९. हजार ९०५ पुरुष मतदार आणि ३ कोटी,७५ लाख,७२, हजार ५७० महिला मतदार आणि ३०८७ तृतीयपंथी मतदार आहेत. तर प्रारुप मतदार यादीमध्ये जुन्या मतदार यादीतील २ कोटी ०६,लाख ८८ हजार ४८७ (२१.१४टक्के) मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
यामध्ये ३४ लाख मयत मतदारांची नावे रद्द करण्यात आली असून १७ लाख मतदारांची नावे दोन मतदार संघात आढळून आल्याने एका मतदार संघातून रद्द करण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीतील ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांपैकी १ कोटी २२ लाख २४ हजार मतदारांच्या गणना प्रपत्रात त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये नातेवाईकांच्या दिलेल्या माहितीशी विसंगत असलेल्या मतदारांची संख्या ६२ लाख ४८ हजार २८१ असून नातेवाईकांशी न जोडलेली (अनमॅप्ड) मतदारांची संख्या ५९ लाख ७५ हजार ६२६ इतकी आहे. मालाड, धारावी, पनवेल, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण, खडकवासला, चिचंवड, हडपसर, सोलापूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर, हिंगणा, बडनेरा आदी मतदार संघात प्रत्येकी एक लाखाहून अधिक मतदारांच्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली असून त्यांना अधिक पुरावे देण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेेत. या मतदारांना अधिक पुरावे द्यावे लागणार असून त्यानंतरच त्यांचे मतदार यादीतील नावे कायम होईल अशी माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
प्रारुप मतदार यादीतील काही विशिष्ट समाजातील मतदारांच्या नावावर आक्षेप घेऊन ती वगळण्याबाबत राजकीय पक्षांनी व्यक्त केलेल्या चिंतेची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे. झारखंडमध्ये भाजपच्या मतदार केंद्र प्रतिनिधींनी अशाप्रकारे मोठ्याप्रमाणात अर्ज करुन विशिष्ट मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीतून वगळण्याची मागणी केल्याचे प्रकरण उघडीस आल्यांतर राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याचे निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मुंबई महापालिका आयुक्त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप मतदार यादीवरील दावे व हरकतींवर निर्णय घेताना खबरादी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रारुप मतदार यादीतील मतदारांच्या निवासाची खात्री झालेली आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव समावेश करण्यास ती पात्र आहेत. मात्र नमुना-७ चा अर्ज करुन प्रारुप मतदार यादीतील नावाला आक्षेप किंवा वगळण्याची मागणी करण्यासाठी मुभा आहे. मात्र अशी मागणी केवळ त्या विधानसभा मतदार संघातीलच व्यक्तींना करता येईल. तसेच आक्षेप घेणाऱ्याला अर्जासोबत सबंधित मतदार अपात्र असल्याचे पुरावे द्यावे लागतील. तसेच ज्याच्या नावावर आक्षेप आहे त्यालाही सुनावणीस उपस्थित राहण्याची आणि पुरावे देण्याची संधी द्यावी असे आदेशात म्हटले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.