loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा येथे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

म्हसळा (प्रतिनिधी): म्हसळा तालुका नाभिक संघाच्या वतीने संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मंगळवार, ०८ सप्टेंबर रोजी अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम नाभिक समाजाचे कार्यकर्ते महेश कृष्णा खराडे यांच्या कुंभारआळी येथील निवासस्थानी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पोथी पठण करण्यात आली. तालुक्याचे माजी अध्यक्ष विलास यादव गुरुजी यांनी पोथी पठण करीत असताना सर्वांना समजेल अशा भाषेत पोथीचा अर्थ सांगितला. सकाळी ११:३० वाजता महाआरती करून उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मंगलप्रसंगी नाभिक समाजाचे म्हसळा तालुका अध्यक्ष सुशील यादव, महिला अध्यक्ष मेघना कदम, जोशीला खराडे, सुप्रिया यादव, नथुराम पवार, राजेंद्र बडे, मंगेश कदम, महेश खराडे, दिलीप शिर्के, दत्तात्रय जाधव, सदानंद कदम, सुनील भोसले, दीपल शिर्के, प्रशांत चव्हाण, लक्ष्मण पाटील, वैभव जाधव, रुपेश पवार, राकेश पवार, यांच्यासहित म्हसळा तालुक्यातील नाभिक समाजातील बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वी केल्याबद्दल म्हसळा तालुका नाभिक संघाचे व समस्त समाजबांधवांचे उपस्थितांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg