loader
Breaking News
Breaking News
Foto

कलांगण संगमेश्वरतर्फे तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

​रत्नागिरी :'कलांगण संगमेश्वर' च्या वतीने संगमेश्वर तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय येथे पार पडणार असून, नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख सोमवार, दि. २८ सप्टेंबर आहे. ​या स्पर्धेसाठी १) 'वंदे मातरम्'चे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान २) योद्धा संन्यासी: स्वामी विवेकानंद आणि स्वामी श्रद्धानंद ३) चवदार तळे सत्याग्रह आणि सामाजिक समरसता ४) अन्न संस्कार: काल, आज आणि उद्या! हे चार विषय देण्यात आले असून स्पर्धकासाठी ७ + १ = ८ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रोख रु. २०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकाला रोख रु. १५००/-, पुस्तक आणि प्रशस्तीपत्र, तर तृतीय क्रमांकाला रोख रु. १०००/-, पुस्तक आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. याशिवाय सर्वोत्तम मार्गदर्शक शिक्षकास रोख रु. १०००/- आणि प्रशस्तीपत्राचे विशेष पारितोषिक दिले जाईल तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 'सहभाग प्रशस्तीपत्र' प्रदान केले जाईल. एका शाळेतून २ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आशिष सरमोकादम (९६७३५२९२०७) किंवा यश कापडी (९४२२५६४०१८) यांच्याशी शाळेने संपर्क साधावा. तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी - विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन कलांगणच्या वतीने ​वक्तृत्व स्पर्धा समन्वयक जेष्ठ अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि कलांगण संगमेश्वरचे अध्यक्ष अमोल लोध यांनी स्पर्धेच्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg