loader
Breaking News
Breaking News
Foto

वाटद-खंडाळ्यात दहीहंडीचा जल्लोष; पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत यांच्या उपस्थितीने उत्सवाला रंगत

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबू पाटील मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाला पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी उपस्थिती लावत मोठा उत्साह निर्माण केला. यंदाच्या दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भैया सामंत यांची उपस्थिती. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने वाटद-खंडाळा परिसरात अक्षरशः उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा थरार आणि दहीहंडी फोडण्यासाठी सुरू असलेली चुरस यामुळे परिसर दुमदुमून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी ऑर्केस्ट्राचे आयोजन. एका बाजूला गोविंदा पथके मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती, तर दुसऱ्या बाजूला मराठी गाण्यांच्या तालावर उपस्थितांची पावले थिरकत होती. मराठी गीत-संगीतामुळे संपूर्ण परिसर उत्सवी रंगात न्हाऊन निघाला. सेनेचे बाबू पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. केवळ दहीहंडीचा कार्यक्रम न राहता पंचक्रोशीतील ग्रामस्थांना एकत्र आणणारा हा उत्सव म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. यंदाही वाटद-खंडाळ्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद लुटला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg