loader
Breaking News
Breaking News
Foto

उमरोली जि.प.गटाची प्रभाग आढावा बैठक संपन्न, आरती संग्रहाचे ’ प्रकाशन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळुण तालुक्यातील उमरोली जि.प. गटाची प्रभाग निहाय आढावा बैठक चैतन्य रिसॉर्ट, रामपूर येथे जि.प. सदस्य प्रमोद निवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उमरोली पं.स. सदस्य गौरव पाटेकर, गुढे पं.स. सदस्या सौ. सुप्रियाताई वंजारे, विभागप्रमुख संदिप घाग, ज्येष्ठ शिवसैनिक सतिशकाका चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख प्रितम वंजारे, उपविभाग प्रमुख संतोष हळदणकर, उपविभाग प्रमुख मंगेश गुढेकर, सहकार सेनेचे प्रभाकर जाधव तसेच विविध खात्यांचे अधिकारी, गटातील ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रशासक, ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना प्रशासनाला करण्यात आल्या. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘आरती संग्रहाचे’ प्रकाशन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg