केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. कोकणातील सर्वात मोठा उत्सव असल्याने कोकणात हजारो चाकरमानी आणि भाविक दाखल होत असतात. गणरायाच्या स्वागतासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. आनंद द्विगुणित करणा-या उत्सवात महावितरणने वीजपुरवठा सुरळीत आणि अखंड ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, निदान सणाच्या काळात तरी वारंवार होणारे वीजखंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी महावितरणने यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी लांजा तालुक्यातील जनतेतून केली जात आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण आहे. घराघरांत गणरायाचे आगमन होत असल्याने सजावट, रोषणाई, आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. विजेच्या रोषणाईमुळे या उत्सवाला अधिकच रंगत येते. अशा परिस्थितीत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता असते. पावसाळा सुरू असल्याने झाडे पडझडीच्या घटना घडतात, त्यामुळे विज वाहिन्या तुटणे, पोल पडणे, तांत्रिक अडचणी अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी वीजवाहिन्या तसेच विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेऊन गणपती सणामध्ये जनतेला सुरळीत विज पुरवठा देण्यासाठी प्रयत्न करावा, ही अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सव काळात तातडीने गावातील तक्रारीची दखल घेऊन तेथील विजेच्या समस्या तात्काळ कशा सोडवता येतील यासाठी आपत्कालीन पथके, अतिरिक्त कर्मचारी आणि तातडीच्या तक्रार निवारणाची यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवावी, अशी मागणी ही लांजा तालुक्यातील जनतेतून केली जात आहे. आनंदाच्या उत्सवात रोषणाईमुळे हिरमोड होता नये, हीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
टाइम्स स्पेशल
दिल्लीच्या मतदार यादीत फारच गोंधळ , भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे देखील नाव SIR च्या यादीमध्ये विसंगतीसह आढळले .









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.