loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या शिक्षिका प्रीती श्रीनिवासन नायर यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडच्या ज्येष्ठ शिक्षिका व समाजशास्त्र विषयाच्या विभागप्रमुख सौ. प्रीती श्रीनिवासन नायर यांची कृष्णा सहोदया, सांगली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार्‍या प्रतिष्ठित ‘ आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगलीचे उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते सौ. प्रीती श्रीनिवासन नायर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्यातील सातत्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, प्रभावी अध्यापन पद्धती, नेतृत्वगुण तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी व अर्थपूर्ण शिक्षणाचे अनुभव देण्यासाठी त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची या पुरस्कारासाठी विशेष दखल घेण्यात आली. रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg