दापोली (प्रतिनिधी) : एक दिवस आपल्या गावासाठी ही प्रत्यक्षातील संकल्पना राबवत आघारी ग्रामस्थांनी आपल्या एकजुटीच्या जोरावर गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आणि सरकारी निधीची वाट न पाहता स्वतःच्या शारीरिक श्रमाच्या साहाय्याने आघारी फाटा ते आघारी गाव दरम्यानच्या ४ कि.मी. अंतर लांबीच्या रस्त्याची दुतर्फा वाढलेली झाडी काढणे, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत उपटून टाकणं, रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून टाकण्याचे महत्त्वाचे काम करुन सुरळीत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला यासाठी आघारीतील तब्बल १०० महिला पुरुषांचे हात राबले.
श्रमदानातून रस्ते सुधारणा हा ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा एक उत्तम सामुदायिक मार्ग आहे. जेव्हा सरकारी यंत्रणेकडून कामाला उशीर होतो किंवा स्थानिक पातळीवर तातडीने दुरुस्तीची गरज असते, तेव्हा लोक एकत्र येऊन स्वतःच्या श्रमाने रस्ता दुरुस्त करतात. तशाच प्रकारचे रस्ता साफसफाई आणि रस्ता सुधारणा करण्याचे काम दापोली तालुक्यातील आघारी या गावातील कानसे वाडी, रहाटे वाडी, काष्टे वाडी, मधली वाडी, गणेश वाडी आणि खळे वाडीतील लोकांनी एकत्र येऊन आघारी फाटा ते आघारी गाव दरम्यानचा ४ किमी अंतर लांबीच्या रस्त्यातील छोटे-मोठे खड्डे मुरूम आणि खडी टाकून व्यवस्थित बुजवून टाकले, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडीझुडपे आणि कचरा साफ केला जेणेकरून वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसेल आणि अपघाताच्या घटना घडणार नाहीत. एकत्र काम केल्यामुळे समाजात एकतेची भावना निर्माण होते आणि सार्वजनिक मालमत्तेविषयी आपुलकी वाढते या विचाराने आघारी येथील ग्रामस्थांनी आपल्या गावातील रस्त्यांची साफसफाई करत रस्त्यांना मोकळा श्वास देत रस्ते सुस्थितीत केले.
आघारी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अजित खळे, उपाध्यक्ष अरुण म्हातले, सचिव मिलिंद घर्वे, उपसचिव योगेश रहाटे, खजिनदार अशोक कानसरे, उप खजिनदार अजित आडविलकर त्याचप्रमाणे महिला मंडळ अध्यक्षा सायली काष्टे, उपाध्यक्ष संचिता घर्वे आणि सहकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या गावांसाठी श्रमदान केले. गौरी-गणपती सणात गावात येणारे भक्तगण मुंबई चाकरमानी तसेच गावात येणाऱ्या एस.टी. बस वाहतुकीसाठी खाजगी वाहतुकीला रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडी झुडपांमुळे अपघातांच्या घटना घडू नयेत गावात ये-जा करणाऱ्या कोणाही प्रवाशी व्यक्तींना या मार्गावरील सुरळीत वाहतूकीला अडसर येवू नये, यासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानाने रस्ता सुधारणा करण्याचे महत्वाचे काम केले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.