संगमेश्वर (सत्यवान विचारे): "आगसली ती मागासली... अन मागून ईली ती.....पुढं गेली!" अशीच काहीशी उद्विग्न आणि विषण्ण करणारी परिस्थिती सध्या संगमेश्वर तालुक्यातील जुन्या पदवीधर शिक्षकांची झाली आहे. तब्बल २५ ते ३० वर्षे पदवीधर शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेल्या अनुभवी शिक्षकांना आज आपल्या हक्कासाठी प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. जिल्ह्यातील जुन्या पदवीधर भाषा आणि समाजशास्त्र या विषयांच्या शिक्षकांना पदोन्नती किंवा योग्य सेवापट मिळण्याऐवजी, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून थेट गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती या आठवड्यात केली जाणार आहे. यामुळे गेल्या २५-३० वर्षांपासून सेवा देणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांना थेट 'उपशिक्षक' म्हणून काम करावे लागण्याची नामुष्की ओढवली आहे.
नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय धोरनांमुळे आपली ही काय फरफट चालू आहे, असा उद्विग्न सवाल हे अनुभवी शिक्षक विचारत आहेत. "आधी आमचा विचार करा, आम्हाला पदोन्नती व योग्य न्याय द्या, मगच नवीन भरतीची प्रक्रिया राबवा," अशी ठाम भूमिका जुन्या शिक्षकांनी घेतली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पदवीधर शिक्षकांना जसा न्याय दिला गेला, तसाच न्याय रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनाही मिळाला पाहिजे, असा सूर उमटत आहे. या गंभीर प्रश्नातून सुवर्णमध्य काढण्यासाठी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात सध्या बैठका आणि गाठीभेटींचे सत्र सुरु आहे.
शिक्षकांच्या या दुरवस्थेमुळे केवळ शिक्षकच नव्हे, तर संपूर्ण समाज, पालक आणि विद्यार्थी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. तीन दशकांचा दांडगा अनुभव असणाऱ्या शिक्षकांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे असताना, प्रशासकीय गणितांमुळे अनुभवी हात बाजूला पडत आहेत. समाजाला आज चांगल्या अन् अनुभवी शिक्षकांची गरज आहे, मात्र प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे अनुभवी शिक्षकांच्या पदरी फक्त उपेक्षाच येत आहे. आता शिक्षण विभाग या अनुभवी शिक्षकांच्या अश्रूंची दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय देणार, की 'मागून आलेले पुढं गेले' या उक्तीप्रमाणे जुन्या शिक्षकांना अन्यायाच्या गर्तेत ढकलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.