loader
Breaking News
Breaking News
Foto

कसईनाथ डोंगरावर वसलाय सिद्धनाथ महादेव, शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनास गर्दी

दोडामार्ग - दोडामार्ग तालुक्याची ओळख करून देणारा मध्यभागी असलेला कसर्ईनाथ डोंगर हा अनेकांचे लक्ष वेधून घेतो. या डोंगराच्या उंच माथ्यावर श्री देव सिद्धनाथ महादेव जागृत देवस्थान आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी लाखो भक्त भेट देऊन दर्शन घेतात. सोमवारी शेवटच्या श्रावणी सोमवार औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यातील, तसेच गोवा, सिंधुदुर्ग तसेच गोवा राज्यात दोडामार्ग तालुक्यात कामाला असलेल्या परराज्यातील हजारो भाविकांनी तसेच वयस्कर भक्त यांनी जवळपास अडीच किलोमीटर डोंगर चढून सिंध्दनाथ महादेव, पिंडी, नंदी, ञिशुल, यांचे दर्शन घेऊन पिंडीवर बेलपञ हार, फुले अर्पण करत दुधाचा अभिषेक केला. पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांची डोंगर चढायला सुरुवात झाली होती. दुपारी आंबेली सातेरी मंदिरात हजारो भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोडामार्ग तालुक्यातील कसर्ईनाथ डोंगर या ठिकाणी विराजमान श्री देव सिंध्दनाथ महादेव जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पांडव वनवासात असताना या ठिकाणी या देवस्थानची निर्मिती झाली तर काही स्वयंभू मूर्ती पण आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठिकाणी तीर्थ क्षेत्र निर्माण करायचे होते. यासाठी पांडवांनी काही रचना केल्या होत्या पण काम अपुरे राहिले पांडवांनी निर्माण केलेल्या काही पाषाण कलाकृती, सिंध्दनाथ मूर्ती, महादेव पिंड, ञिशुल, नंदी, आजही या ठिकाणी बघायला मिळतात. श्रावण महिन्यात या ठिकाणी लाखो भक्त दाखल होतात. शिवाय इतर दिवशी उन्हाळ्यात पण अनेक जण कसर्ईनाथ डोंगर सर करुन जातात. अनेक पर्यटक देखील या ठिकाणी भेट देतात. कसर्ईनाथ डोंगर चढून गेल्यावर वरून आंबोली सातेरी मंदिराचा गावचा निसर्ग रम्य परिसर, तसेच कसर्ई दोडामार्ग गाव तिलारी कालवा बहरलेली शेती बागायती सभोवताली हिरवेगार डोंगर निसर्ग मन हेलावून जाते. अशी रचना या कसर्ईनाथ डोंगरावर गेल्यावर अनुभवायला मिळते.

टाईम्स स्पेशल

कसर्ईनाथ डोंगरावर विराजमान श्री देव सिंध्दनाथ महादेव दर्शन घेण्यासाठी आंबेली गावातून जावे लागते, गिरोडा, पिकुळे, दिशेने वाट आहे. पण अनेक जण आंबेली गावातून जातात. या ठिकाणी एवढी गर्दी होते गावात दुचाकी, चारचाकी वाहने उभी करायला जागा अपुरी पडते. ७ सप्टेंबर हा शेवटचा श्रावणी सोमवार यामुळे पहाटे भाविक फुले, दूध, बेल, नारळ, केळी, घेऊन दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. आठ वाजल्यानंतर गर्दी वाढत गेली. या ठिकाणी जाण्यासाठी अडीच किलोमीटर डोंगर चढाई करावी लागते. काहीसा थकवा जाणवतो पण श्रध्देने भक्त हा डोंगर सहज चढाई करतात. यात लहान मुले, युवा वर्ग, तसेच वयस्कर भक्त तसेच महिला मोठया संख्येने दर्शन घेण्यासाठी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg