loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबव पोंक्षे गावात स्वछता अभियान

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावांत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात सगळीकडे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. गावातील प्रत्येक वाडीतील रहिवाशांनी स्वयंस्फूर्ती ने ग्रामपंचायतीच्या या अभियानात सहभाग घेतला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, वेली, आदींची कटाई करण्यात आली. रस्त्यालगत वाढलेले गवत, ग्रास कटरच्या सहाय्याने साफ करण्यात आले. मुख्य रस्ता स्वछ दिसण्यासाठी, रस्ते झाडण्यात आले. रस्त्यावर वाकलेल्या मोठ्या मोठ्या फांद्या देखील तोडण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्वच्छता अभियानात पुरुषांसोबतच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या अभियानामुळे गावातील मुख्य व वाडीजोड रस्ते चकाचक झाले आहेत. गावचे सरपंच शेखर उकार्डे, व उपासरपंच मंगेश मांडवकर आणि अन्य ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी या अभियानात सहभागी झाली होती. ग्राम स्वच्छता अभियानामुळे आता आंबव पोंक्षे गाव गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg