देवगड (प्रतिनिधी) - “गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्हा बाळा,गोविंदा आला रे…” अशा गाण्यांच्या तालावर आणि उत्साहपूर्ण जल्लोषी वातावरणात आज देवगड तालुक्यात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध मंडळांच्या वतीने मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या असून, त्या फोडण्यासाठी सायंकाळी उशिरा पर्यंत गोविंदा पथकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. आज सकाळ पासून देवगड जामसंडे शहर परिसरात तसेच तालुक्यात ठिकठिकाणी गोविंदाचा उत्साह दिसून येत होता. दुपारपासून गोविंदानी शिस्तबद्ध पद्धतीने डीजेच्या तालावर नाच गाण्याचा ताल धरला होता.हा उत्साह जशी जशी संध्याकाळ वाढत होती तसं तसा जल्लोष वाढत होता.
शहरातील मांजरेकर नाका येथे लायन्स स्टारच्या वतीने उभारण्यात आलेल्या 8 दहीहंडीचे पूजन उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी अप्पा मांजरेकर, अनिल खडपकर, रोहित ढोके, प्रसाद मांजरेकर, तुषार पेडणेकर, वीरेंद्र कांबळे, गौरव पारकर, केदार मांजरेकर, नगरसेवक विशाल मांजरेकर, शरद शिंदे, प्रणील खडपकर तसेच लायन्स स्टारचे पदाधिकारी उपस्थित होते. देवगड जामसंडे या शहरी भागात विविध भागांमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. फ्रेंड सर्कल, इंद्रधनू, देवगड-जामसंडे व्यापारी संघटना, रिक्षा चालकांनी, कॉलेज रोड, एस टी स्टँड, जामसंडे बाजारपेठ, वडांबा स्टॉप, आदी ठिकाणी आकर्षक दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. सायंकाळी पाच नंतर या हंड्या फोडण्यासाठी गोविंद पथकांनी फेरा धरत मानवी मनोऱ्यांचे एकावर एक थर लावत सलामी देत होते.
दहीहंडी पाहण्यासाठी तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणामुळे उत्साहाला उधाण आले होते. “गोविंदा रे गोपाळा”च्या जयघोषात दहीहंडी फोडताना परिसर जल्लोषाने दुमदुमून जाताना कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या या उत्सवामुळे देवगडमध्ये भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होताना अनेकांच्या चेहऱ्यावर नव चैतन्य दिसत होते. रात्रो उशिरा पर्यंत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम चालू होता. दरम्यान देवगड तालुक्यात पडेल कँटिंग, विजयदुर्ग, शिरगाव, मिठबाव या मोठ्या गावासह अनेक गावामध्ये सकाळपासून रात्रो उशिरापर्यंत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. काही ठिकाणी खास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.