loader
Breaking News
Breaking News
Foto

नेमळे धनगरवाडी ग्रामस्थांकडून रस्त्याविषयी नेमळे ग्रामपंचायतीला उपोषणाचा इशारा

नेमळे - नेमळे गावकर कुंभारवाडीमधून धनगरवाडी वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत नमूना न 23 मध्ये अद्याप नोंद झाली नसल्याने नेमळे ग्रामपंचायतीडून या रस्त्यावर कुठच्याही प्रकारची डागडुजी किंवा सुधारणा झाली नाही पिढ्यानपिढ्या या रस्त्यावरून शाळकरी मुले, शेतकरी, ग्रामस्थ, त्यांची पाळीव जनावरे यांची सतत रहदारी चालू असते. सदर रस्ता खड्डेमय झाला असुन रस्त्यावरून चालणे ही धोकादायक झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन 2022 च्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जि. प. सिंधुदुर्ग यांच्या कडून धनगर समाजाच्या मूलभूत गरजाचे निराकरण करणे बाबतच्या 4 /5 /2022 च्या बैठकीमध्ये धनगर वाड्या वस्त्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याकरिता भूसंपादन करून रस्ते मिळणेबाबतचे निवेदन नेमळे ग्रामपंचायतीला प्राप्त झाले होते. मात्र नेमळे ग्रामपंचायतीने यासंदर्भात कुठच्याही प्रकारचा पाठपुरावा केला नसल्यामुळे आज नेमळे गावातील धनगर वाडी वस्त्यावरील जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत नमूना न 23 ला अद्याप नोंद झाली नसल्याने धनगर समाज या रस्त्यापासून वंचित राहिला आहे.

टाईम्स स्पेशल

सदर गावकर कुंभारवाडीमधून जाणाऱ्या धनगरवाडी रस्त्याची लवकरात लवकर ग्रामपंचायत नमूना न 23 ला नोंद व्हावी नाहीतर धनगर वाडीवरील सर्व ग्रामस्थ महिला मुले या सर्वांना घेऊन नेमळे ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन गावकर कुंभारवाडी धनगरवाडी वस्तीकडून नेमळे ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg