देवगड (प्रतिनिधी) शिरगाव-साटमवाडी येथे वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून चोरून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकाने डोंबिवली येथून शिताफीने ताब्यात घेतले. तन्मय राजेंद्र साटम (वय २९, मूळ रा. शेवरे, शिरगाव, ता. देवगड, सध्या रा. दोन टाकी, धर्मा चाळ, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिरगाव-साटमवाडी येथे जयश्री सदाशिव बावसकर यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ अज्ञात इसमाने हिसकावून नेली होती. याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू करण्यात आला. पोलिसांनी मानवी कौशल्यासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान संशयित आरोपी तन्मय साटम याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर तो डोंबिवली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १ सप्टेंबर २०२६ रोजी डोंबिवलीतील गणेशनगर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची पोलिसांसमक्ष कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वीही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या शीळ-डायघर पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यातही तो पाहिजे असलेला आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची पुढील तपासासाठी आवश्यकता असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून २ सप्टेंबर २०२६ रोजी पुढील कायदेशीर कारवाईसाठी देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, एएसआय राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.