loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर खालचापाटमध्ये मध्यरात्री भीषण आग; घर जळून खाक, तरुणांच्या प्रसंगावधानामुळे बामणे कुटुंबातील सर्वजण सुखरूप

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरातील खालचापाट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बामणे यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. आग वेगाने पसरत असल्याची परिस्थिती पाहून धनाराज ओक, स्वानंद दीक्षित, वेदांत कनगुटकर, विराज शिंदे, आर्या खोत, दीपक काणे आणि निखिल ओक या सात तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आगीचा धोका असतानाही या तरुणांनी प्रसंगावधान राखत घरातील व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे बामणे कुटुंबातील सर्वजण सुखरूप बाहेर पडले आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली. संकटाच्या क्षणी धावून येत मदतीचा हात देणार्‍या या तरुणांचे परिसरातून कौतुक होत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत घरातील मोठ्या प्रमाणातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. भक्ष्यस्थानी पडले होते. प्राथमिक माहितीनुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे नेमके किती आर्थिक नुकसान झाले, याचा पंचनामा आणि पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

घटनेची माहिती मिळताच गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निता मालप यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि तरुणांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. या घटनेनंतर गुहागर शहरातील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाढती लोकवस्ती आणि काही भागांतील अरुंद रस्ते लक्षात घेता गुहागर शहरासाठी सुसज्ज अग्निशमन वाहन तसेच सक्षम अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एका बाजूला या आगीत बामणे कुटुंबाचे घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे; मात्र दुसर्‍या बाजूला धनाराज ओक यांच्यासह सात तरुणांनी दाखवलेल्या धाडस आणि प्रसंगावधानामुळे कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचले. संकटाच्या काळात माणुसकीच्या भावनेतून केलेली ही मदत निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg