loader
Breaking News
Breaking News
Foto

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून खेड येथे स्वागत

रत्नागिरी, दि. २: कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या आजपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच खेड येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. आगामी प्रशासकीय कामकाज आणि मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खेड येथे आगमन होताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, खेड उप विभागीय अधिकारी वैशाली पाटील, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार सुधीर सोनवणे तसेच अर्चना बोंबे यांच्यासह महसूल व निवडणूक विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg