loader
Breaking News
Breaking News
Foto

सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्क करून धोका निर्माण; खेडमध्ये गुन्हे दाखल

खेड : सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील पहिला गुन्हा हा भरणे नाका, परिसरात दि. ४ सप्टेंबर रोजी सायं. १९.३६ वा. चे सुमारास दाखल करण्यात आला. हा गुन्हा रात्री २२.४८ वा. गुन्हा रजिस्टर नंबर - १८४/२०२६ कलम - भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ प्रमाणे फिर्यादी - तेजस्विनी उमेश जाधव, मपोशि/४५८, नेमणूक खेड पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात आला. संशयित आरोपी विवेक विजय आब्रे रा. चाकाळे, शिवाजीनगर, ता. खेड, जि. रत्नागिरी. या संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी क्र. एम.एच. ०४, ई.एम.ए.आर. १४९६ भरणे नाका, ड्रोखाली रस्त्याच्या मध्येच येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना तसेच सार्वजनिक रोडने जाणार्‍या पादचार्‍यांना धोका निर्माण होईल, अशा स्थितीत उभी करून तो कुठेतरी निघून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यातील दुसरा गुन्हा हा देखील भरणे नाका येथे सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन उभे करून पादचारी व वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी आणखी एकावर कारवाई केली आहे. सदर गुन्हा क्र. २५ दिनांक ०४/सप्टेंबर रोजी १८.४८ वा.दाखल. करण्यात आला. दि. ०४ सप्टेंबर रोजी २२.२९ वा. गु.र.नं. - १८५/२०२६, भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम २८१ प्रमाणे फिर्यादी - धनंजय लहू मालेकर, पोशि/१५६, नेमणूक खेड पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीनुसार नोंद करण्यात आली. संशयित आरोपी संतोष गणपत मनवळ (५६), रा.मनवलळ वाडी, मोरवंडे, ता. खेड, जि. या संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी क्र. एम.एच. ६२, ई.सी. ८००२ ही गाडी भरणे नाका, भोस्तेखाली रस्त्याच्या मध्ये येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना तसेच सार्वजनिक रोडने जाणार्‍या पादचार्‍यांना धोका निर्माण होईल, अशा स्थितीत उभी करून तो कुठेतरी निघून गेला होता. सदर दोन्ही गुन्ह्यांचा खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg