loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी तीव्र उताराचे वळण आता अपघाचे मुख्य केंद्र, आणखी किती जीव गेल्यानंतर संबधित प्रशासन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार?

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा नजीक आंजणारी येथील तीव्र वळणावर गेल्या एका महिन्यात चार अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला ही घटना ताजी असली तरी या आधी या धोकादायक वळणावर शेकडो झालेल्या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सतत होणार्‍या या अपघातांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे. आंजणारी तीव्र उताराचे वळण आता अपघाचे मुख्य केंद्र (ब्लॅक स्पॉट) बनले आहे. आणखी कीती जणांचे जीव गेल्यानंतर संबधित प्रशासनाकडून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार? असा तीव्र संताप स्थानिक नागरीकांतून केला जात आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. सुखकर आणि जलद गतीने प्रवास होण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र चौपदरीकरणाच्या कामात मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक वळणे घाट रस्ते तसीच ठेवण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतह: लांजा तालुक्यातील वेरळ, आंजणारी घाट तीव्र वळण धोकादायक प्रवण क्षेत्र क्रुपसिध्द असताना ही वळणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातून वगळण्यात न येता त्याच पध्दतीने रस्ता तयार करण्यात आला आहे. आंजनारी येथील वळणाचा रस्ता अत्यंत तीव्र आणि दिशाभूल करणारा आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाले असले, तरी या विशिष्ट वळणावर वाहनाचा वेग नियंत्रित न राहिल्याने गाड्या घसरून किंवा समोरासमोर धडकून मोठे अपघात होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात या ठिकाणी अपघातांचे प्रमाण दुप्पट होते. दिशादर्शक फलकांचा अभाव आणि अपुरा प्रकाश यांमुळे परगावाहून येणार्‍या चालकांना वळणाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जाते. अपघाताचे प्रवणक्षेत्र असलेल्या या धोकादायक वळणावर चार-आठ दिवसांनी एखादा अपघात ठरलेलाच असतो अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून दिली जात आहे.

टाईम्स स्पेशल

अपघात झाल्यानंतर केवळ पंचनामा करण्यापलीकडे किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप जनतेकडून होत आहे. हे वळण क्षेत्र अपघातमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. वळणाच्या दोन्ही बाजूंना ठळक आणि रात्री चमकणारे दिशादर्शक व संकेत फलक लावणे, वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर्स किंवा रंबलर स्ट्रिप्स बसवणे, रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसण्यासाठी ब्लिंकर्स आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे, पुढे तीव्र उतार व धोकादायक वळण आहे वहाने हळू चालवा असे मोठे डिजीटल किंवा रेडिअम फलक कीमान ५०० मीटर आधी लावण्यात आले पाहिजेत, संरक्षण भिंत वळणाच्या बाजूला दरी कींवा खोल भागात वाहने कोसळू नयेत म्हणुन मजबूत सिमेंटची भिंत बांधण्यात यावी, ईत्यादी उपाययोजना आवश्यक असल्याचे बोलले जात असुन आंजणारी येथे वारंवार होणारे अपघात ही दुर्घटना नसून प्रशासकीय अनास्थेचा बळी असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. त्यामुळे वारंवार होणारे सदर अपघात रोखण्यासाठी आता प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg