loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचा सुपुत्र रुपेश गोधडे ठरला ‘नमो श्री’ किताबाचा मानकरी

खेड (प्रतिनिधी )- भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड आयोजित, दहीहंडी निमित्त ‘नमो श्री २६’ ऍड. वैभव खेडेकर (भारतीय जनता पार्टी, नेते, माजी नगराध्यक्ष नगरपालिका खेड) यांनी भरवलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तालुक्यातील तरुणांचा सहभाग होता. आपल्या शरीरयष्टीचे प्रदर्शन करीत तरुणांनी स्पर्धेला रंगत आणली पण उत्कृष्ट पिळदार शरीर आणि सर्वोत्कृष्ट पोझिंगच्या बळावर रुपेश गोधडे याने नमो श्री कितबावर आपले नाव कोरले. रुपेश यांना आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर तसेच भारतीय टीमचे कोच नंदकिशोर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या आधीही रुपेश रत्नागिरी कुमार जिल्हा निवड चाचणी किताबाचा मानकरी ठरला होता. रुपेश याने या दोन्ही किताबाचे श्रेय आपले कोच नंदकिशोर शिंदे आणि त्यांची पत्नी सौ. सोनाली गोधडे यांंना दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg