loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख येथील सखी महिला मंडळाची सप्तलिंगी दर्शन यात्रा उत्साहात संपन्न; भारत भ्रमंतीनंतरही देवरूखच्या निसर्गसौंदर्याने आणि शिवलिंगांच्या पावन सहवासाने जिंकली मने

प्रकाश चाळके/देवळे - क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने देवनगरी देवरूख पर्यटन अंतर्गत आयोजित करण्यात येणार्‍या खास ‘सप्तलिंगी दर्शन यात्रा’ या अनोख्या पर्यटन व आध्यात्मिक सफरीचा अनुभव आज देवरूख येथील सखी महिला मंडळाच्या २० सदस्यांनी उत्स्फूर्तपणे घेतला. सप्तलिंगी नदीच्या काठावरील विविध शिवलिंगांचे दर्शन, निसर्गरम्य परिसराची सफर आणि सप्तलिंगी नदीचे मनोहरी दर्शन असा अध्यात्म, निसर्ग आणि पर्यटन यांचा सुंदर संगम असलेल्या या यात्रेत सखी महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अखिल भारतात विविध पर्यटनस्थळांना भेटी देऊन अनेक ठिकाणांचा अनुभव घेतल्यानंतरही आपल्या स्वतःच्या देवरूख परिसरातील अद्भुत निसर्गसौंदर्य आणि पावन धार्मिक स्थळांचा अनुभव घेण्याचा निश्चय सखी महिला मंडळाच्या प्रमुख शिला घस्ते मॅडम यांनी केला. त्यांच्या या संकल्पनेला मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि तब्बल २० जणांच्या सहभागातून सप्तलिंगी दर्शन यात्रा आनंदात पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात्रेदरम्यान सहभागी सदस्यांना सप्तलिंगी नदीचे नयनरम्य दर्शन, नदीकाठावरील शिवलिंगे, परिसरातील प्राचीन मंदिरे तसेच या शिवलिंगांचा ज्योतिर्लिंगांशी असलेला धार्मिक व आध्यात्मिक संदर्भ याबाबत माहिती देण्यात आली. *विशेष म्हणजे, एका दिवसात तब्बल १२ शिवलिंगांचे दर्शन घडण्याचा दुर्मिळ योगायोग या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. भारतभर फिरून विविध निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतरही आपल्या देवरूख परिसरातच इतके अद्भुत निसर्गसौंदर्य, आध्यात्मिक ऊर्जा आणि शिवलिंगांचा पावन सहवास अनुभवायला मिळतो, याचा विशेष आनंद असल्याची भावना सहभागी महिला सदस्यांनी व्यक्त केली. ‘सप्तलिंगी दर्शन यात्रा’ हा अनुभव अत्यंत सुंदर, वेगळा आणि आध्यात्मिक समाधान देणारा आहे, अशा प्रतिक्रिया सदस्यांनी व्यक्त केल्या.

टाइम्स स्पेशल

या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश घस्ते आणि संजय सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली. क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने सहभागी यात्रेकरूंना संपूर्ण प्रवासात निसर्ग, मंदिरे, शिवलिंगे आणि त्यांचे धार्मिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गाईडची व्यवस्था, चहा, नाश्ता आणि जेवणाचे नियोजनही अत्यंत व्यवस्थित करण्यात आले होते. देवनगरी देवरूख पर्यटन या संकल्पनेअंतर्गत आपल्या परिसरातील निसर्ग, नदी, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यांचा स्थानिक नागरिकांसह पर्यटकांपर्यंत परिचय करून देण्याचा प्रयत्न क्रांती व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग असलेली सप्तलिंगी दर्शन यात्रा ही देवरूख परिसराच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख देणारी संकल्पना ठरत असून, स्थानिकांनी आपल्या परिसरातील अद्भुत पर्यटनस्थळांचा अभिमानाने अनुभव घ्यावा, असा संदेश या यात्रेतून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg