loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी महासंघाचे ७ सप्टेंबरला धरणे आंदोलन, मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी

देवळे (प्रकाश चाळके) - महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने उद्या, सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असलेल्या महासंघाच्या रास्त मागण्यांबाबत वरिष्ठ प्रशासन व संबंधित कार्यासनाने सकारात्मक निर्णय घेऊन मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी महासंघाची ठाम मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महासंघाच्या मागण्या मान्य न केल्यास, शेतकरी व कृषी क्षेत्राच्या प्रश्नांबाबत संबंधित वरिष्ठ प्रशासन व कार्यासन असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रशासकीय व शेतकरीहिताच्या गैरसोयींसाठी संबंधित प्रशासन व कार्यासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी असे आंदोलन करणाऱ्या कृषी महासंघाने म्हटले आहे. उद्या सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात वरिष्ठ प्रशासनाने व कार्यासनाने कृषि महासंघाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कृषी विभागातील आंदोलन कर्त्यांची आहे.

टाईम्स स्पेशल

उद्या तोडगा न निघाल्यास 21 तारखेपासून कामबंद आंदोलनाचा इशारा कृषि महासंघाने दिला आहे, त्यामुळे तोडगा न निघाल्यास याचा अर्थ वरिष्ठ प्रशासन व संबंधित कार्यासन यांनी मुद्दामहून व हेकेखोर पणे शेतकऱ्यांची गैरसोय करण्याच्या उद्देशाने कामबंद आंदोलन करण्यास मूक संमती दिली आहे असा त्याचा मतितार्थ असेल. शेतकरीहित, कर्मचारीहित आणि कृषी विभागाच्या सक्षम भविष्यासाठी शासनाने सकारात्मक व तातडीची भूमिका घ्यावी, असे आवाहन कृषी सेवा महासंघाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg