loader
Breaking News
Breaking News
Foto

बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली!

वैभववाडी (प्रतिनिधी) : आठवडा बाजाराच्या दिवशी एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी वैभववाडी बसस्थानकात घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली असून, बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने चोरट्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवारी वैभववाडीचा आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेसह बसस्थानक परिसरात मोठी गर्दी होती. दुपारी एक वाजता सुटणारी सडुरे-शिराळे एस.टी. बस बसस्थानकात दाखल झाली होती. प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करत असताना शिराळे येथील वयोवृद्ध महिला जयवंती तुकाराम पाटील याही बसमध्ये चढत होत्या. याचवेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने पाठीमागून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचली. माळ खेचल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून मदतीसाठी धावा केला. मात्र, बसमध्ये चढण्याच्या गडबडीत असल्याने त्यावेळी त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घटनास्थळावरून पलायन केले.

टाइम्स स्पेशल

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी तत्काळ बसस्थानकात धाव घेतली. पोलिसांनी जयवंती पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच चोरट्याचा माग काढण्यासाठी वैभववाडी बाजारपेठेपासून फोंडा बाजारपेठेपर्यंत परिसरात गस्त घालत संशयितांचा शोध घेतला. मात्र, पोलिसांच्या हाती संशयित लागला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg