loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पोलिसांची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, ‘रेड्स’ एआय ऍप’ प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशात तिसर्‍या स्थानी

रत्नागिरी (जमीर खलफे) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’विकसित भारत’ संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तंत्रज्ञानाधिष्ठित आधुनिक पोलिसींगच्या व्हिजनला अनुसरून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अत्यंत नावीन्यपूर्ण कामगिरी केली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या एआय आधारित रेड्स ऍपने राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या ’प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत संपूर्ण देशात तृतीय क्रमांक पटकावून सुवर्णयश संपादन केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पोलीस तपासात प्रभावी वापर करणार्‍या या अभिनव उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या एआय आधारित ऍपचे सादरीकरण हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे करण्यात आले होते. अज्ञात व बेवारस व्यक्तींची ओळख पटवणे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपींचे चेहरे पुनर्निर्मित करून त्यांचा शोध घेणे या उद्देशाने हे तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. ज्या प्रकरणात मृत व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे ओळखता येत नाही किंवा चेहरा अत्यंत खराब झाला आहे, अशा ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारे एआय ऍपद्वारे संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करून ओळख पटवली जाते. तसेच बेपत्ता, फरार व विविध गुन्ह्यांतील आरोपींचे जुने, अस्पष्ट किंवा काळाच्या ओघात बदललेले फोटो उपलब्ध असल्यास, तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहर्‍याची १०८ विविध डिजिटल प्रतिरूपे तयार करून तपासाला अधिक गती दिली जाते. या ऍपचा रत्नागिरी पोलिसांनी प्रत्यक्ष तपासात अतिशय प्रभावी वापर केला आहे.

टाइम्स स्पेशल

या संपूर्ण विकास पथकाच्या प्रयत्नांमुळे पोलीस तपास अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक झाला असून, राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या गौरवामुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg