loader
Breaking News
Breaking News
Foto

युवा उद्योजक अनिकेतदादा कदम यांचा वाढदिवस मुंबईत उत्साहात साजरा

मुंबई : खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र आणि मुंबई महानगरातील युवा उद्योजक अनिकेतदादा कदम यांचा वाढदिवस कांदिवली येथील हॅथवे साई स्टार ऑफिसमध्ये मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रगतिशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांचे सुपुत्र असलेले अनिकेतदादा कदम हे आपल्या शांत, मितभाषी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे मित्रपरिवार, आप्तेष्ट तसेच सहकाऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यवसायाच्या क्षेत्रात मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या व्यवसायासोबतच मित्रपरिवार व प्रियजनांना जपण्याची त्यांची खास शैली सर्वांनाच भावते. अनिकेतदादांच्या वाढदिवसानिमित्त हॅथवे साई स्टार डेटा कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सहकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील सदानंद उर्फ आप्पा कदम, तसेच नितीन केणी, शंकर नायर, रामदास मुरकुटे, मंगेश कदम, परेश शेट्टी, निलेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी अनिकेतदादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला. उपस्थितांनी अनिकेतदादांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि व्यवसायात उत्तरोत्तर भरभराट लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. मित्रपरिवार, सहकारी आणि आप्तेष्टांच्या प्रेमळ शुभेच्छांनी अनिकेतदादा कदम यांचा वाढदिवसाचा सोहळा अविस्मरणीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg