loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबईच्या वैदिक वास्तुशास्त्र परीक्षेत दापोली येथील डॉ. अनिल सावंत उत्तीर्ण

संगलट (इक्बाल जमादार) - भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबईच्या वैदिक वास्तुशास्त्र परीक्षेत डॉ. अनिल सावंत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबईच्यावतीने जुलै 2026 मध्ये आयोजित केलेल्या वैदिक वास्तुशास्त्र (सिसीएफइ) परीक्षेत दापोलीचे प्रसिद्ध ज्योतिष विशारद व वास्तुशास्त्र तज्ञ डॉ. अनिल सहदेव सावंत यांनी यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केला व ते उत्तीर्ण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. सावंत यांना संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रा. आनंदसर राणे यांचे मौलिक मार्गदर्शन उपयोगी पडले. दि. 3 सप्टेंबर रोजी दादर - मुंबई गुरुकुल हॉल येथे प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रमोहन रानडे यांच्या हस्ते डॉ. अनिल सावंत यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य डॉ. आनंदसर राणे, डॉ. रानडे, केसरी टूर्सच्या सुनीता पाटील, आदी मान्यवर उपास्थित होते. डॉ. सावंत यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg