loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती जाहीर

मालवण (प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील विनोद सांडव यांची उपजिल्हा संघटकपदी तर नगरसेवक तपस्वी मयेकर यांची मालवण तालुका समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मालवण तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आता विनोद सांडव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासह संघटनात्मक बांधणीला बळ देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये जयेंद्र परुळेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्तेपदी, तर चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची सावंतवाडी विधानसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय गावडे (वेंगुर्ले), लक्ष्मण रावराणे (वैभववाडी) आणि रामराव उर्फ चंदन गावकर (दोडामार्ग) यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वसंत खानविलकर (वैभववाडी), लक्ष्मण आयनोडकर (दोडामार्ग) आणि विनोद सांडव (मालवण) यांची उपजिल्हा संघटकपदी निवड झाली आहे. राजू राठोड यांची कणकवली तालुकाप्रमुख, रमाकांत मोरे यांची वैभववाडी तालुका संघटक, निशांत तोरस्कर यांची सावंतवाडी तालुका संघटक आणि विजय नाईक यांची वेंगुर्ले तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय राजेश टंगसाळी यांची कुडाळ उपतालुका संघटक, तर नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांची ओबीसी सेल कुडाळ तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा समन्वयकपदी अमर घाडी, विधानसभा समन्वयक म्हणून प्रसाद रेणगेकर (कुडाळ), विठोबा गुरव (कणकवली) यांच्यासह तालुका समन्वयक आणि सहसमन्वयकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण तालुका समन्वयकपदी तपस्वी मयेकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg