loader
Breaking News
Breaking News
Foto

नवयुग उत्कर्ष युवक मंडळ हे लांजा तालुक्यातील पहिले डिजे मुक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरणार

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाने यावर्षीपासून डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवयुग उत्कर्ष युवक मंडळ हे लांजा तालुक्यातील पहिले डिजे मुक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरले आहे.सन १९८१ मध्ये स्थापन झालेले लांजा तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळ हे तालुक्यातील जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मंडळाच्या माध्यमातून आजवर विविध सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक देखावे सादर करून जनजागृती करण्याचा भर देखील मंडळाकडून केला जातो. याशिवाय विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल या उत्सवात होत असते.रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना डिजे मुक्त गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

या आवाहनाला प्रतिसाद देत लांजा तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड यांनी डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात आज मंडळाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना पत्र देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र लाड, राजू गांधी यांच्यासह लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg