loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वेळणेश्वर विद्यालयाचे सुयश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सोमवार, दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पाचेरी आगर, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वेळणेश्वर विद्यालयातील 14 वर्षांखालील वयोगटामध्ये गोरक्ष विलास पेडणेकर व आरोही दत्तात्रय वावरे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील सुमारे 10 विद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेमध्ये आरोही दत्तात्रय वावरे हिने आपल्या बुद्धिबळ खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली. तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे तसेच शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यालयाच्या वतीने आरोही दत्तात्रय वावरे हिचे हार्दिक अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg