loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखचे कला शिक्षक दिगंबर मांडवकर यांच्या चित्रांचे ठाणे येथे प्रदर्शन : आराध्य -एक अनुभूती

देवळे (प्रकाश चाळके) - न्यू इंग्लिश स्कूल देवरुखचे कला शिक्षक दिगंबर मांडवकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन ठाणे येथील ऊर्जा फौंडेशनचे अध्यक्ष मुरलीधर चांदिवडे यांनी आयोजित केले आहे. प्रदर्शनासाठी आराध्य -एक अनुभूती हा विषय घेऊन मांडवकर यांनी गणेशाची विविध रूपे रेखाटली आहेत. आजपर्यँत मांडवकर यांची विविध शहरातील नामवंत आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन झालेली आहेत. 6 तारखेपासून ठाणे येथील हे प्रदर्शन रसिकांना पाहता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उदघाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून संजय यादवराव, योगेश निवळकर, सचिन तेलंगे, कल्पेश घाग, पराग संखे, विकास सावंत, हेमंत परब, रामचंद्र बिरवाडकर, सदानंद भागवत, विजय परीट, निलेश सावंत, प्रकाश राजेशिर्के, दीना पांचाळ, नितीन केणी, मीरा चाफेकर, सुशांत पांचाळ,कु. ज्योत्स्ना शिंदे,श्री. मधु मेनन,कु. आरती राज,कु. अनुपा देसाई,श्री. संदीप गोरीवले, निलेश जाधव, जय पालांडे आदी उपस्थित रहाणार आहेत. दिगंबर मांडवकर यांच्या चित्र प्रदर्शनाला देवरुख शहरवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत उदघाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg