loader
Breaking News
Breaking News
Foto

नायरी महादेव मंदिर, बारमाई वाहणारा धोधावणे धबधबा व निवळी गाव येथील पर्यटन स्थळाच्या विकास कामांना निधी उपलब्ध करून द्यावा, डॉ विनय नातू यांची मागणी

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील नायरी महादेव मंदिर, बारमाही वाहणारा धोधावणे धबधबा व निवळी गाव येथील पर्यटन स्थळाच्या विकास कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सिंधू रत्न समृद्ध योजना २.०० चे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री ना.शंभूराजे देसाई यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. नायरी येथे अनेक प्राचीन अवशेष असलेलं, अत्यंत निसर्ग रमणीय ठिकाण असलेलं पुरातन शंभू महादेव मंदिर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

किल्ले प्रचतगडाच्या तिवरे घाटाच्या दरीत जे जिवंत झरे आहेत त्यातीलच एक चमत्कार म्हणजे धोधावणे धबधबा जो बारमाही कोसळत असतो आणि वाहत जाऊन पुढे हा प्रवाह शास्त्री नदीत विलीन होतो. ब्रिटिश काळातील गॅझेटियर्स मध्ये या धबधब्याचा उल्लेख केला गेला आहे. उन्हाळ्यातही 20,000 गॅलन्स पाणी दर दिवशी वाहत असलेल्या या धबधब्याला स्थानिक धामणकोंड या नावानेही ओळखतात. हा धबधबा बारमाही असल्याचा उल्लेख ब्रिटिशांच्या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या भौगोलिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे. ब्रिटिशांनी या भागाचे टॉपोग्राफिकल नकाशे तयार केले होते ज्यामध्ये या जलप्रपाताचा संदर्भ आढळतो.

टाईम्स स्पेशल

निवळी हा गाव प्रस्तावित नायरी ते पाटण नवीन घाट रस्ता प्रजिमा ४७ वर येत असून उन्हाळ्यात थंड हवा व हिवाळ्यात उबदार हवा असलेला सह्याद्रीच्या खोऱ्यातील इको टुरिझम साठी उत्तम स्थळ होऊ शकणारा व येथील आकर्षित करणारा वजर धबधबा हे या गावचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच या सर्वांचा अभेद्य रक्षक असणारा किल्ले प्रचित गड हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा अशी ही मागणी डॉ. विनय नातू यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार यांचे कडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg