loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक अंकेश्वर खेडकर यांचे गुहागर मनसेकडून जंगी स्वागत

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर पोलीस ठाणेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अंकेश्वर खेडकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी गुहागर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. गुहागरमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“गुहागरच्या जनतेच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर मनसेची भूमिका स्पष्ट आहे की, नागरिकांच्या हितासाठी आवाज उठवणार आणि प्रशासनाला आवश्यक ते सहकार्यही देखील करणार!” असा ठाम संदेश यावेळी मनसे गुहागरच्या वतीने देण्यात आला. या सदिच्छा भेटीवेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकासचिव प्रशांत साटले, मनविसे गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, सांस्कृतिक अध्यक्ष राहुल जाधव, मळण शाखाध्यक्ष मंगेश धामणस्कर तसेच महाराष्ट्र सैनिक महेश शिगवण उपस्थित होते. सुरक्षित गुहागर… समृद्ध गुहागर राहण्यासाठी मनसे सदैव प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

नागरिकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव मैदानात उभी राहील, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला. जानवळे फाट्यासमोर सीएनजीच्या गाड्या उभे असल्यामुळे जानवळे फाट्यावरून वाहक चालकांना राष्ट्रीय महामार्ग गाड्या दिसून येत नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतो असेही सांगण्यात आले. गुहागर पोलीस निरीक्षकांनी तात्काळ ब्रॅकेट लावण्यात येतील असे आश्वासन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg