loader
Breaking News
Breaking News
Foto

भातगाव गोळेवाडी येथे दि.16 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील भातगाव गोळेवाडी येथे बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 : 00 वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या शुभहस्ते गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून या भव्य दिव्य सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, कुणबी समाजोन्नती संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते, गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र हुमणे गुरुजी, व्हाईस. चेअरमन तुकाराम निवाते, पाचेरी सडा पंचायत समिती गणाच्या सदस्या सुचिता घाणेकर, शिवसेना तवसाळ गट अध्यक्ष प्रदीप सुर्वे, शिवसेना युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर काजरोळकर, स्वीय्य सहाय्यक विजय मोहिते, पाचेरी गणाचे विभाग प्रमुख विशाल गोताड, कुणबी समाजोन्नती संघ तवसाळ गटाचे अध्यक्ष शंकर जोशी, शिवसेना महिला आघाडी तवसाळ गटाच्या उपाध्यक्षा रेणुका आग्रे आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे संपूर्ण आयोजन भातगाव गोळेवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg