loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर लांजा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला, आमदार किरण सांमत यांच्या पाठपुराव्याला यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील नागरिकांसाठी तसेच वाहन चालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे लांजा उड्डाण पूल दिनांक १०सप्टेबर पासून दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असून गणेशोत्सवासाठी गावी येणा-या चाकरमानी मंडळीना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गेली बरीच वर्ष लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम रखडले होते. केव्हा मार्गी लागणार याच प्रतिक्षेत प्रवाशी जनता होती. अखेर पुल सुरु झाल्याने नागरीकांची प्रतिक्षा संपली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरातून, गावातून जाणार्‍या मर्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पण आता या उड्डाण पुलामुळे वाहनधारकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होणार आहे. गणेशोत्सवापुर्वी पुल वाहतुकीस खुला करण्यात आल्याने वाहतुकीची होणारी कोंडी थांबणार आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर स्थानिक नागरिक, वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान देणार्‍या सर्व संबंधित यंत्रणांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg