loader
Breaking News
Breaking News
Foto

विश्वकोश ज्ञान वर्धन स्पर्धेत उर्दू माध्यमाच्या शाळेतील रझिया अझीम शेखचे घवघवीत यश

संगमेश्वर (मकरंद सुर्वे)-अंजुमन रियाज उल- इस्लाम या उर्दू हायस्कूलची कु. रझिया अझीम अहमद शेख या विद्यार्थीनींने मराठी विश्वकोश ज्ञान वर्धन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या यशाबद्दल तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या या विद्यार्थीनीला उत्तम मार्गदर्शन करणार्‍या शीतल मोरे (शीतल योगेश कदम) या शिक्षिकेचे देखील अभिनंदन होत आहे. अंजूमन रियाझ उल- इस्लाम या प्रशालेच्या मुख्याध्यापिका महोदयांच्या प्रोत्साहनाने हे यश प्राप्त झाले असल्याचे कळते. या उर्दू हायस्कूलच्या शिरपेचात हा मानाचा तुरा म्हणावा लागेल. उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थीनीला गौरव पुरस्कार आणि रोख पारितोषिकाची सन्मान राशी देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg