loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद

मालवण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित 'मालवण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ - २०२७ मध्ये, मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळवत जिल्हास्तरावर धडक मारली आहे. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या या संघाने कट्टा संघावर मात करत हे विजेतेपद प्राप्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विजेतेपदाने मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे नेतृत्व करायला सज्ज झालेल्या ह्या रोझरी इंग्लिश स्कूल कबड्डी संघाचे प्रशिक्षक जेरी फर्नांडिस, हितचिंतक जेवी फर्नांडिस, मार्गदर्शक - सहकारी यांची देखिल विशेष प्रशंसा करण्यात येत आहे. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या संघाने तालुकास्तरीय विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशालेचे आजी - माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकांनी रोझरी इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg