loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर आगारात एनसीएमसी कार्डचा गोंधळ; पूर्ण तिकीट वसुलीने प्रवासी त्रस्त..., उबाठा शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

वरवेली, (गणेश किर्वे) - गुहागर एस.टी. आगारात महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड वाटप सुरू करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कार्ड असूनही महिलांकडून पूर्ण तिकीट वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच कार्ड रिचार्ज कुठे करायचा, वापरण्याची प्रक्रिया काय याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संभ्रम असून अनागोंदी कारभार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुहागर आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन जाब विचारण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी शिवसेना तालुका महिला संघटिका सिद्धीताई सुर्वे यांनी, एनसीएमसी कार्ड असूनही सवलत का दिली जात नाही, रिचार्जची अधिकृत प्रक्रिया काय आहे, याबाबत तात्काळ खुलासा करावा व प्रवाशांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी केली. यावेळी रानवी ग्रामपंचायत प्रशासक मनाली कदम, युवा सेना तालुका प्रमुख निनाद नार्वेकर, युवा सेना शहर प्रमुख राज विखारे, यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी तात्काळ सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg