loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबोलीत पाणी द्या! पाणी द्या! चा आक्रोश, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण

कळंबोली (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर कळंबोली परिसरातील अनियमित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडको प्रशासनाच्या कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने सिडको अधिकार्‍यांना निवेदन देत मुबलक पाणी द्या, पाणी द्या ... चा आक्रोश नागरिकांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीतील विविध भागांत कमी दाबाने तसेच अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. आगामी गणेशोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढणार असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने पाहणी करून बिघाड दुरुस्त करावा, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना मुबलक व नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत प्रशासनाने चालढकल केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पदाधिकार्‍यांनी दिला. यासंदर्भात आज सिडकोचे सहाय्यक अभियंते प्रफुल देवरे आणि प्रशांत चाहारे यांची शिवसेना कळंबोली शहर विभागप्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर, शहर संघटिका ज्योती राजेश मोहिते, उपशहर संघटिका निशाताई जाधव, आदी मान्यवरांनी भेट घेऊन सिडकोच्या भोंगळ कारभाराचा निषेध करून त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कळंबोली शहर विभागप्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांनी यावेळी दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg