loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील संगलट गावातील ‘नदीम नाडकर’ यांची ‘मोहल्ला शाखाप्रमुख’ निवड झाल्याने संगलट ग्रामस्थांकडून भव्य सत्कार!

संगलट(खेड)(प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील संगलट मोहल्ला शाखा प्रमुख म्हणून नदीम अनवर नाडकर यांची शिवसेनेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरचे नियुक्तीपत्र महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते देण्यात आले. नदीम नाडकर यांची नियुक्ती झाल्याने संगलट मोहल्यामध्ये त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. सदरचा सत्कार हा मुजीबभाई नाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सईदभाई नाडकर, इकबाल नाडकर, सत्तार जाफर नाडकर, जुबेरभाई काजी, बशीरभाई जमादार, अकबर नाडकर, हिंदयात नाडकर आदी. अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

टाइम्स स्पेशल

यावेळी नदीम नाडकर म्हणाले की, ‘‘ हे मला मिळालेलं पद गावाला मिळालेलं पद आहे. गावाच्या विकास कामासाठी महाराष्ट्राच्या लोकप्रिय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे पाठपुरावा करणार असून रस्ते, वीज, पाणी असे समस्या सोडवीन'', असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित म्हणून मुजीब नाडकर यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg