loader
Breaking News
Breaking News
Foto

‘गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ’, गुहागरची विशेष सभा संपन्न!

वरवेली(गणेश किर्वे)- गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर यांची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत पाटपन्हाळे (शृंगारतळी) येथे पार पडली. या सभेला गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सचिव प्रवीण प्रकाश रहाटे, सहसचिव गणेश किर्वे, बांधकाम समिती अध्यक्ष शशिकांत रहाटे, युवा समिती प्रमुख समाधान रहाटे, महिला समिती प्रमुख रिया राऊत, सल्लागार मदन जाधव, चंद्रकांत महाडिक, विजय रहाटे, सदानंद पवार,अनिल रहाटे, माजी महिला समिती अध्यक्ष दिव्या किर्वे, मनोहर रहाटे, संदीप महाडिक, सुहास रहाटे, सचिन राऊत, संदीप राऊत, राजेंद्र राऊत, विजय गोपाळ रहाटे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. या सभेमध्ये सुरुवातीला सहसचिव गणेश किर्वे यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांचे शब्द सुमनाने स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सभेमध्ये जानवळे येथील समाजाच्या मालकीच्या जागेमध्ये समाजभवन उभारणे याबाबत चर्चा विनिमय आणि त्यासाठीचे नियोजन करणे या बाबत निर्णय घेण्यात आले. या जागेमध्ये समाज भवन बांधण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. समाजभवन बांधकामासाठी गुहागर तालुक्यातील प्रत्येक गावातील तेली समाज बांधव यांच्याकडून आर्थिक सहकार्य मिळणे गरजेचे आहे. तसेच जास्तीत जास्त देणगी मिळवण्यासाठी समाज बांधवांनी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. आर्थिक व वस्तू स्वरूपात देणगी स्वीकारली जाईल. असेही सांगण्यात आले. महिला समितीने देखील प्रत्येक गावातील महिलांची जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करणे गरजेचे आहे. युवा समितीचे प्रत्येक गावामध्ये सभासद नोंदणीचे काम चांगल्या रीतीने सुरू असून जास्तीत जास्त युवकांनी सभासद नोंदणी करावे असे आवाहन करून तेली समाज भवन साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी समाजाचे अध्यक्ष प्रकाश झगडे यांनी सांगितले की, विजयादशमी (दसरा) या दिवशी तेली समाज भवन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे, असे सांगून सर्व समाज बांधवांनी अविरतपणे या समाजभवनासाठी योगदान दिले तर नक्कीच सुसज्ज तेली समाज भवन निर्माण होऊ शकेल असे स्पष्ट केले. या सभेमध्ये युवक समिती प्रमुख समाधान रहाटे(पालपेणे), महिला समिती प्रमुख रिया राजेंद्र राऊत (नरवण), उपाध्यक्ष रुणाली रहाटे, अँटी करप्शनचे संस्थेचे पी. आर. ओ. म्हणून नियुक्त झालेले दिलीप जाधव (मळण) यांचाही समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg