loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुका शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग

रत्नागिरी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना तसेच रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांमध्ये कुस्तीचे सामने घेण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे प्रमुख नवनाथ जाधव यांनी संपूर्ण स्पर्धेचे अत्यंत नियोजनबद्ध व सुंदर आयोजन केले. यावेळी कुस्ती असोसिएशनचे सचिव सदानंद जोशी व ज्येष्ठ कुस्तीगीर मारुती पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे रत्नागिरी तालुक्यातील शालेय क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातही अशाच प्रकारे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा मानस आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg