loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांनी मसुरे येथे शिवाजी परब यांच्या निवासस्थानी परब कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट!

मालवण(प्रतिनिधी)- राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांनी मसुरे येथे शिवाजी परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन झाले होते. सरोज यांच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नेहमी हसतमुख असणार्‍या सरोज ताई यांची उणीव आम्हाला निश्चितच भासणार आहे. आम्ही परब कुटुंबाच्या या दुःखात सहभागी आहोत असे खासदार नारायण राणे कुटुंबियांचे सांत्वन करताना म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सरोज परब यांचे पती शिवाजी परब, मुलगी मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण, मुलगा राहुल परब यांचे खासदार नारायण राणे, सौ. नीलम राणे यानी सांत्वन केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि. प. सदस्य क्षमा हडकर, उपसभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, डॉ. सुधीर मेहेंदळे, सूर्यकांत फणसेकर, महेश बागवे, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, संदीप हडकर, राजेश गावकर, पंढरीनाथ मसुरकर, जगदीश चव्हाण, अजय प्रभूगावकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, रोहेश गावकर, गणेश परब, पुरुषोत्तम शिंगरे यांसह अन्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg