सावंतवाडी: शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात 'लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन'च्या (लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट) वतीने मुंबईतील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंबल गावचे सुपुत्र आणि गुणवंत शिक्षक विजय सावंत यांचा मुंबईचे माजी शेरीफ जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विजय सावंत यांच्यासोबतच राहुल जगताप व इतर मान्यवर शिक्षकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना विजय सावंत म्हणाले, "हा माझा एकट्याचा सन्मान नसून मला घडवणाऱ्या आणि शिकवण्याची संधी देणाऱ्या 'सोशल सर्व्हिस लीग' या संस्थेचा, माझ्या सहकारी शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान आहे. रात्रशाळेत येणारे विद्यार्थी वयाने मोठे असतात. दिवसभर काम करून अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची आस उराशी बाळगून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात आणि यशस्वी होतात." विजय सावंत यांनी शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय योगदान दिले आहे. SCERT पुणे, MEPA औरंगाबाद, आणि RAA औरंगाबाद/नाशिक येथे त्यांनी इंग्रजी व इतर विषयांसाठी राज्यस्तरीय मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. पाठ्यपुस्तकांसाठी क्यूआर (QR) कोड तयार करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
शिक्षणासोबतच साहित्य क्षेत्रातही त्यांची पकड मजबूत आहे. त्यांचे 'प्रकाशकिरणाच्या शोधात' आणि 'जगण्याचे आर्त' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून 'धाकावयले कावळे' हा नवा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. यापूर्वी त्यांना एकता कल्चरल अकादमीचा 'महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार', अहिल्या शिक्षण संस्थेचा 'गुणवंत शिक्षक पुरस्कार', आणि लक्ष्मी शिक्षण संस्थेचा 'साने गुरुजी पुरस्कार' मिळालेला आहे. या सोहळ्याला विजय परदेशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय सावंत यांच्या या यशाबद्दल कुंबल गावातील ग्रामस्थ आणि शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.