loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड हादरले! खवटी येथे घरफोडी, ६० हजारांचा ऐवज लंपास

खेड (खवटी) : खेड तालुक्यात चोरीच्या घटनांना उत आला असतानाच खवटी गावात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत घरातील ६० हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेने खवटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खवटी येथील एका कुटुंबाचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट आणि सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या वस्तूंसह एकूण ६०,७५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहिती घेत आहेत.

टाईम्स स्पेशल

गेल्या काही दिवसांपासून खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यात घरफोडी आणि दुकानफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक घरे बंद असतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg