loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय फणसोप येथे विद्यार्थी गुण गौरव सोहळा उत्साहात

रत्नागिरी : जीवन विद्या मंडळ कसोप फणसोप संचलित श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय फणसोप येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून फणसोप विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी तर्फे आज दिनांक ०४/०९/२०२६ रोजी श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मागलाड, फणसोप, वायंगणी येथील गुणवंत विद्यार्थी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. इस्त्रो या संस्थेची सफर करण्यासाठी च्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती, असे विद्यार्थी, व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यासोबतच महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ते यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोज साळवी, नविन साळवी, अरविंद सावंत, हरिश्चंद्र शिंदे, राजेंद्र साळवी - सेक्रेटरी, रेणुकाताई आग्रे, लीनाताई देसाई, प्रवीण साळवी तसेच निता सावंत व त्यांचे चिरंजीव प्रतीक सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यासोबतच जीवन विद्या मंडळ कसोप फणसोप या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय . कमलाकर उर्फ बबन काका साळवी व शाळा समिती अध्यक्ष प्रकाशजी साळवी, व संस्था सदस्य रितेशजी साळवी व चेतन साळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच रत्नागिरीतील दानशूर नीता सावंत व त्यांचे चिरंजीव प्रतीक सावंत यांनी विद्यालयातील एका मुलीचा दहावीपर्यंतचा संपूर्ण खर्च उचलला. तसेच नवीन साळवी यांनी शाळेतील दोन होतकरू विद्यार्थ्यांचा वर्षभराचा खर्च त्यांनी करण्याचे आश्वासन या कार्यक्रमांमध्ये दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg