loader
Breaking News
Breaking News
Foto

महिलांना हाफ टिकिट स्मार्ट कार्ड संदर्भात मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगितल्याने एस. टी. रोको आंदोलन स्थगित!

दोडामार्ग(प्रतिनिधी) - राज्य सरकारने महिलांना एस. टी. बसमधून पन्नास टक्के सवलत जाहीर केली. आणि अचानक महिलांना हाफ टिकिट पाहिजे तर स्मार्ट कार्ड आवश्यक आहे असे सांगून फुल टिकिट आकारणी करून एक प्रकारे महिलांची दिशाभूल करत सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्मार्ट कार्ड सक्ती रद्द करावी मुदतवाढ मिळावी यासाठी बुधवारी शिवसेना ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यानी दोडामार्ग बसस्थानक या ठिकाणी स्थानकावरून सुटणार्‍या बसेस रोखल्या. या नंतर दोडामार्ग बस स्थानक कंट्रोल प्रमुख यानी कणकवली विभाग नियंत्रण अधिकारी समवेत चर्चा घडवून आणली यावेळी स्मार्ट कार्ड मुदतवाढ देण्यासाठी मंञालयात बैठक घेतली जात आहे. असे सांगितले यामुळे एस टी बसेस रोखणे आंदोलन मागे घेतले.

टाईम्स स्पेशल

दोडामार्ग तालुक्यातील महिलांना हाफ टिकिट आकारणी केली जात होती पण राज्य सरकार परिवहन मंत्री यांनी अचानक हाफ टिकिट बंद करून ज्यांनी स्मार्ट कार्ड काढले त्याना हाफ टिकिट इतरांना नाही अशी अट घातली. यामुळे सरकार विरोधी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात शिवसेना ठाकरे सेना पदाधिकारी बाबुराव धुरी तसेच राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांनी महिलांना हाफ टिकिट प्रवास करु दिला नाही तर दोडामार्ग बस स्थानक येथून एकही बस सोडणार नाही असा इशारा दिला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg