loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी ते मार्च मध्ये होणार? निवडणूक आयोग सज्ज होतोय !

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२७ मध्ये मणिपूर राज्याला वगळून उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि गोवा या राज्यात जनगणनेचे काम वेळेपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर 2026 ते 4 जानेवारी 20२७ दरम्यान पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यानंतर या राज्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये सर्वच राजकीय पक्ष आता सज्ज होऊ लागले आहेत .भाजपा काँग्रेस सपा बसपा आम आदमी पार्टीसह अन्य पक्षांनी देखील आता कंबर कसली आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आतापासूनच सुरू झाले आहे. मोदी सरकारच्या एका निर्णयाच्या आधारावर सांगता येईल की उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि गोवा राज्यातील विधानसभा निवडणुका फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या राज्यात निवडणूक आयोगाने आपली तयारी पूर्ण केली आहे तीन राज्यात एस आय आर चे काम पूर्ण झाले आहे तर दोन राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे लवकरच या राज्यात जनगणना पूर्ण होणार आहे सुरक्षा बलाच्या मागणीसह इतर कामकाजाबाबत आयोगाने तयारी केली असून जानेवारी महिन्यात निवडणुकीचे बिगुल वाजेल आणि फेब्रुवारी मार्च दरम्यान निवडणुकांचे मतदान होण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg