loader
Breaking News
Breaking News
Foto

खेमनाथ गोविंदा पथकाचा महाडमध्ये डंका! सुसेरी-खारीच्या गोविंदांनी लावले कडक ८ थर

खेड : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच उत्साहात खेमनाथ गोविंदा पथक, सुसेरी खारी यांनी महाड येथे कडक ८ थरांचा थरारक मानवी मनोरा रचून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाड येथील दहीहंडी उत्सवात सुसेरी खारीच्या गोविंदांनी अफाट ताकद, एकजूट आणि संतुलनाचे प्रदर्शन करत ८ थर यशस्वीरित्या लावले आणि सुरक्षितपणे उतरवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात गोविंदा पथकाचे जोरदार कौतुक केले. कोकणातील ग्रामीण भागातील पथकाने एवढ्या उंचीचा थर रचल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर खेमनाथ गोविंदा पथकाने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg